घराचा पाया खोदताना सापडली मानवी हाडे, शहरात खळबळ

102

सामना प्रतिनिधी, सेलू

येथील वालूर नाक्यावर असलेल्या एका घरात घराचे बांधकाम सुरू आहे. घराचा पाया खोदत असतांना आज सायंकाळी साडे सहा वाजता मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

येथील वालुर नाक्यावरील राधाबाई काळे यांच्या घराचे घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. घराच्या पायाचे खोदकाम सुरू असताना अचानक मानवी हाडे सापडली. विशेष म्हणजे ही हाडे कापड्यासकट निघाली. माणूस जसे शर्ट घालतो तसेच्या तसे निघाल्याने चर्चेला उधाण आले आहे.घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, डॉ. वैशाली बोधनकर, बिट जमादार संजय साळवे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सदरील हाडे मानवी असून कपडे देखील निघाले आहेत.ही मानवी हाडे नांदेड येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून तपासणी करण्यात येणार आहे. यानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार आहे. दरम्यान या घटनेची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.ही मानवी हाडे घरात कशी काय पुरली? ती मृत व्यक्ती कोण आहे? ही हाडे किती वर्षांपूर्वीची आहेत? यासह इतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांच्या तपासानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या