चाललंय काय? मुरबाडपाठोपाठ भिवंडीतही कवटी सापडल्याने खळबळ

444
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । भिवंडी

मुरबाडमध्ये कवटी सापडल्याची घटना ताजी असतानाच आज भिवंडी तालुक्यातील शेलार गाव परिसरात असलेल्या झाडाझुडपात एक कवटी व हाडे सापडली आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून ही कवटी व हाडे मीठपाडा येथून बेपत्ता असलेल्या भरत कांबळे या तरुणाची असावीत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शेलार परिसरातील मीठपाडा येथील संतोष वारघडे हे शेतकरी शेळी चरण्यासाठी शेलार गावालगत असलेल्या जंगलातील झाडाझुडपात गेले होते. त्यावेळी त्यांना मानवी कवटी व हाडे नजरेस पडली. या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यास दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना दिली. त्यामुळे एपीआय राजीव पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पवार, वैभव देशपांडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून कवटी व हाडे ताब्यात घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक अर्धवट जळालेले पाकीट सापडले असून त्यात भरत कांबळे यांच्या नावाने सिराज हॉस्पिटलचे ओळखपत्र सापडले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता भरत कांबळे हे मीठपाडा येथे राहणारे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कांबळे कुटुंबीयांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या