अकोला पालिकेत भाजप नगरसेवकाने आणले डुक्कर

2

सामना वृत्तसेवा । अकोला

अकोला महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही शहरात प्रचंड अस्वच्छता आहे. महापौर विजय अग्रवाल यांचे या अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात डुकराचे पिल्लू सोडले.

सभागृहात शहरातील स्वच्छतेवर चर्चा सुरू होती. त्यावेळी अकोल्यातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी भर सभागृहात हातात डुक्कर घेऊन प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी महापौर आणि भाजप नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. अखेर शहरातील अस्वच्छतेचा निषेध करण्यासाठी नगरसेवक शर्मा यांनी सभागृहात डुक्कर सोडले.