राक्षसासोबत लफडी करू नका!

9


सामना ऑनलाईन, कॅरोलिना

अमेरिकेच्या पूर्वेकडील भागाला फ्लोरेन्स वादळाचा तडाखा बसणार आहे. हे वादळ महाविध्वंसकारी असण्याची शक्यता तिथल्या हवामान खात्याने वर्तवली आहे. कॅोरोलिनाच्या उत्तरेकडील भागाला वादळाने तडाखा देण्याची ६० वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.

फ्लोरेन्स वादळ १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने घोंघावतंय. वादळासोबतच तुफान पाऊस आणि पुराचाही इशारा देण्यात आला आहे. यामुळे पूर्वी वादळ बघितलं असलं, अनुभवलं असलं तरी यावेळी या राक्षसासोबत लफडी करू नका असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  या वादळाचा ३ राज्यातील जवळपास १७ लाख लोकांना तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या