पत्नी नंतर आता पतीही झाला करोडपती

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

खूप कष्ट केले तरी काही माणसं यशस्वी होत नाहीत. मात्र काही माणसं इतकी नशीबवान असतात की घरबसल्या करोडपती होतात. असंच एक जोडपं आहे जे अवघ्या काही महिन्यातच करोडपती झालं आहे. अमेरिकेच्या मॅसेच्युसेटमध्ये राहणारं जोडपं लॉटरीचं तिकीटं जिंकून तब्बल १२ कोटींचे मालक झाले आहेत.

ऑगस्टमध्ये जेन गुडविन यांनी एक मिलियन डॉलर्स म्हणजेच सहा कोटींपेक्षा जास्त रक्कम लॉटरीतून जिंकली होती. त्यानंतर जवळपास चार महिन्यांनंतर त्यांचे पती रॉबर्ट गुडविन यांनी देखील एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली आहे. त्यांनी हे लॉटरीचं तिकीट पाच डॉलर म्हणजेच फक्त ३१८ रुपयात खरेदी केलं होतं. आता लॉटरीच्या माध्यमातून जिंकलेल्या पैशातून हो जोडपं घर खरेदी करणार आहे.