किल्लारीत पती-पत्नीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । किल्लारी

पत्नीने विष प्राशन करुन जिवन संपवले तर दुसऱ्या दिवशी पतीने गळफास घेतला. अवघ्या दोन -तीन दिवसांच्या कालावधीतच पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना किल्लारी येथे घडली आहे.

किल्लारी येथील मीरा भागवत गुरव (30) यांनी शुक्रवारी विषारी औषध प्राशन केले. शनिवारी पहाटे किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. मृत्यूनंतर शनिवारी मीरा गुरव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला मयत मीरा यांचा पती भागवत गुंडू गुरव ( 35) याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून मयत भागवतचे वडील भागवत लहान असताना मयत झाले होते तर आई किल्लारीच्या भुकंपात मरण पावली होती.