तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही म्हणून पत्नीला पाजले अॅसिड

56

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एका महिलेने तृणमूल काँग्रेसला मत दिलं नाही म्हणून तिच्या पतीने तिला अॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचा पती हा तृणमूलचा कार्यकर्ता असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अंसूरा बीबी असे त्या महिलेचे नाव असून तिने तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे तिचा पती तिच्यावर प्रचंड रागावला होता. त्यानंतर पतीने व सासू सासऱ्यांनी तिला मारहाण केली व त्यानंतर तिच्या तोंडात अॅसिड ओतले. अॅसिडमुळे महिलेची जीभ व तोंडाच्या आतील भाग भाजला असून तिला मुर्शिदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंसूरा बीबीची प्रकृती गंभीर असून तिच्या मुलाने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या