बायको ती बायकोच; बुडणाऱ्या पत्नीला वाचवताच तीने पुन्हा भांडण सुरू केले

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना ऑनलाईन, फरीदाबाद

रागाने बेभान झालेल्या पत्नीने सरळ नदीत उडी मारली. पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. ते पाहून नवरा भांडण विसरला. त्याने त्वरीत नदीत सूर मारला. बुडणाऱ्या पत्नीला वाचवून किनाऱ्यावर आणले. नाका तोंडात पाणी शिरल्याने ती भेदरली होती पण काही काळच. भानावर येताच तीने पुन्हा नवऱ्याशी भांडण सुरू केले. ही घटना फरीदाबाद येथील सेक्टर २८ जवळील आग्रा पूलाजवळ घडली.

फरीदाबाद येथील मवई या भागात रहाणाऱ्या दांपत्यामध्ये घरगुती वादातून भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की, आता मला जगायचेच नाही, असे म्हणत पत्नीने सरळ घराबाहेर धाव घेतली. संतापाच्या भरात तीने वेडे वाकडे पाऊल उचलू नये म्हणून पाठोपाठ नवरा धावला. पत्नीने आग्रा पूलाजवळ येताच कठड्यावर चढून थेट नदीमध्ये उडी मारली. तीला पोहता येत नाही हे पतीला माहीत होते. त्यामुळे तीला वाचवण्यासाठी त्यानेही नदीत उडी मारली. त्यावेळी नदीतील पाणी वेगाने वहात होते. जोरदार प्रवाहातून ती वाहून जाऊ लागली. महत्सप्रयासाने पतीने तीला कशीबशी किनाऱ्यावर आणली. तोपर्यंत अख्खा गाव किनाऱ्यावर जमा झाला होता.

पतीने आपले प्राण वाचवल्यानंतर तरी गप्प घरी जायचे सोडून तीने तेथेच पुन्हा पतीबरोबर भांडण सुरू केले. अखेर ग्रामस्थांनी तीच्या पतीला बाजूला नेल्यानंतर बायकोने तोंडाचा पट्टा बंद केला.