पती-पत्नीचा वाद विकोपाला; पतीची गळफास घेऊन आत्महत्या

2
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरातील भारतनगर येथे पती-पत्नीचा वाद विकोपाला गेल्यामुळे पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतानाच पतीने आपल्या घरी संतापाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी १० वाजता उघडकीस आली.

भारतनगरातील उत्तम वाकळे व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरुन मंगळवार, २३ रोजी रात्री वाद झाला. या वादाचे मोबाईल रेकॉर्डिंग सुद्धा पत्नीने केले होते. ही मोबाईल रेकॉर्डिंग घेऊन पत्नीने पोलीस ठाणे तक्रार देण्यासाठी गाठले. त्यानंतर पती उत्तम वाकळे याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी बबन वाकळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.