भूखंडमाफिया शेर खानची छावणीत हत्या, ५ पैकी ३ गजाआड

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

छावणीतील भूखंडमाफीया हुसेन खान अली यार ऊर्फ शेर खानची बुधवारी मध्यरात्री निघृण हत्या केल्याची घटना लक्ष्मी कॉलनीत गुरुवारी पहाटे उघडकीस आली. प्लाटिंगच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तापासामध्ये निष्पन्न झाले असून पाच मारेकऱ्यांपैकी तीघांना छावणी पोलिसांनी अटक केली.

छावणी परिसरातील पेन्शनपुरा भागामध्ये राहणारा हुसेन खान अली यार ऊर्फ शेर खान (५१) यांचा मिटमिटा, पडेगाव, बेगमपुरा सह शहरात ठिकठिकाणी प्लॉटींगचा व्यवसाय आहे. प्लॉटींग व्यावसायवरुन हुसेन खान आणि त्याच्या साथीदारांमध्ये बुधवारी रात्री लक्ष्मी कॉलनीतील प्राची गॅरेज जवळ शाब्दिक चकमक झाली. हा वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात कडक्याचे भांडण झाले. राग अनावार न झाल्याने त्यांच्या साथीदारांनी लोंखडी गजाने हुसेन खान यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. डोक्याला जबर मार लागल्याने झालेल्या रक्तस्त्रावामुळे हुसेनचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्याने घटना पाहटेच्या उघडकीस आली असून छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याला अधर्वट बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.

मृतक हुसेन खान यांचा मुलगा अन्सार खान हुसेन खान (२१) यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात अजहर खान फजलोद्दीन खान रा. अन्सार कॉलनी, जहॉगिर खान उस्मान खान, शेख लतीफ शेख इस्माईल रा. पडेगाव, अब्दुल इरशाद अब्दुल गफ्फार ऊर्फ बाबु, मुजताब ऊर्फ अक्रम पहेलवान ऊर्फ अक्रम रा. टाईम्स कॉलनी या पाच जणाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पैकी अजहर खान, फजलोद्दीन खान, जहाँगिर खान या तिघांना अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून हत्यासाठी वापरण्यात आलेला लोंखडी गज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाली असल्याचे पोलीस निरीक्षक बहुरे यांनी सांगितले.