माझं लग्न झालंय…! राहुल गांधींचा गौप्यस्फोट

rahul-gandhi

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

कॉंग्रेससोबत माझे दोनाचे चार हात झाले असून सध्या तरी मी पक्षासोबतच्या लग्नागाठीत अडकलो आहे, असे कॉग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी सांगितले. हैदराबाद दौऱ्यात पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी हे विधान केले.

राहुल गांधी दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आले आहेत. 2019 च्या निवडणुकांविषयी पत्रकारांनी विचारले असता राहूल म्हणाले, ‘राज्यातील समान विचारांच्या पक्षांशी हात मिळवण्यास काँग्रेस उत्सुक असून आगामी तेलंगणा निवडणुकीत कॉग्रेसचा विजय निश्चित आहे.

देशांतील अल्पसंख्याक समाजाविषयी राहूल यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. देशात अल्पसंख्यांक समाज असुरक्षित असल्याचे सांगून शेतकरी आणि बेरोजगार यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. चीनमध्ये 24 तासात 50 हजार बेरोजगारांना रोजगार मिळतो. हिंदुस्थानात हे प्रमाण केवळ 458 असल्याचेही ते म्हणाले.

2019 ला मोदी पंतप्रधान नाही

2019 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत. या निवडणुकीत भाजपला 230 जागा मिळणारच नाहीत. त्यामुळे मोदी पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच नाही, असे राहूल यांनी सांगितले.