मी आता सेटल झालोय!

सामना ऑनलाईन,मुंबई

माणसाच्या आयुष्यात अनेक आव्हाने येत असतात. मात्र मी प्रत्येक आव्हान सकारात्मक रीतीने घेतो. विरोधक आव्हाने निर्माण करण्यासाठीच असतात.मात्र पक्षात कोणीही विरोधक नाहीत.  त्यामुळे मी आता ‘सेटल’ झालो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ते ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस इतर सर्व विषयांत नापास, चित्रकलेत मेरिटमध्ये

नांदेड निकालांनंतर काँग्रेसकडून होणाऱया वल्गना म्हणजे एखादा विद्यार्थी सर्व विषयांत नापास झाल्यानंतर चित्रकलेच्या स्पर्धेत मेरिटमध्ये आल्याचा आनंद साजरा करत फिरतो तशापैकी आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियार बंधने नाहीत

सोशल मीडियावर कोणी आमच्यावर टीका करत असेल तर त्याला कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. नोटिसा वगैरे जी कारवाई झाली ती जे लोक फेक अकाऊंटच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर करण्यात आलेली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होईल हे सांगणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. त्यामुळे नारायण राणेंचा विषय टांगणीलाच लागला आहे.