मी माझ्या मुलाचे नाव राम किंवा अलेक्झांडर नाही ठेवू शकत

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मी मुस्लिम आहे. जगात कितीही ‘इस्लामोफोबिया’ असला तरी मी माझ्या बाळाचे नाव राम किंवा अलेक्झांडर नाही ठेवू शकत.’ असे स्पष्ट करत सैफ अली खान याने त्याच्या बाळाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली.

‘मी मुस्लिम असल्याने मी माझ्या धर्मानुसारच बाळाचे नाव ठेवणार. जर मी माझ्या मुलाचं एखादं चांगलं मुस्लिम नाव ठेवलं त्यात काय बिघडलं? मला असं वाटतं असं नाव ठेवल्यामुळे त्याला लहानपणापासूनच धर्मनिरपेक्षतेची शिकवण मिळेल. त्यामुळे नावावरुन वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. तसेच माझ्या बाळाचे नाव तैमूर आहे तर जो क्रूर राज्यकर्ता होता त्याचे नाव तिमूर आहे. या दोन नावांत साधर्म्य असले तरी त्यातला फरकही लोकांनी समजून घ्यायला हवा. अशोक व अलेक्झांडर या नावांनाही हिंसक इतिहास आहे. पण तरिही ही नावे ठेवली जातातच ना’ ’ असे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले.

सैफ करिना यांनी ट्विटरवरुन त्यांच्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहीर केल्यानंतर या नावावरुन बराच वाद झाला होता.