अद्वितीय धोनी संघात होता तर मग मला स्थान कसे मिळणार?


सामना ऑनलाईन । बंगळुरू

श्रीलंकेतील मालिकेच्या अंतिम फेरीत अखेरच्या काही चेंडूंत अविस्मरणीय फटकेबाजी करीत हिंदुस्थानला चॅम्पियन बनवणारा दिनेश कार्तिक याचे तब्बल आठ वर्षांनंतर हिंदुस्थानच्या कसोटी संघात कमबॅक होत आहे. बंगळुरू येथे १४ जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी पत्रकारांशी संवाद साधताना दिनेश कार्तिक म्हणाला, हिंदुस्थानी संघातील स्थान मिळवण्यासाठी कमालीची चुरस असून या काळात महेंद्रसिंग धोनीसारखा असामान्य, अद्वितीय खेळाडू संघात होता तर मला कसे काय स्थान मिळेल, असेही तो यावेळी म्हणाला.

दिनेश कार्तिकने ८७ कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियाच्या चमूत स्थान मिळवलेय. याआधी पार्थिव पटेल याने ८३ कसोटींनंतर हिंदुस्थानी संघात प्रवेश केला होता. यावर दिनेश कार्तिक म्हणाला, या कालावधीत माझ्याकडून अव्वल दर्जाची कामगिरीही होत नव्हती तर मग टीम इंडियात मला प्रवेश तरी कसा मिळेल.

मुलीमुळे माझ्यात बदल झाला
क्रिकेटर म्हणून माझ्यामध्ये किती बदल झाला हे माहीत नाही, पण मुलीच्या जन्मानंतर माझ्यामध्ये बदल घडून आला. कारण मुली वडिलांच्या जवळ असतात, असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला.