केजरीवाल देशातील टॉप मुख्यमंत्री! सर्वेक्षण कंपनीचा दावा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सोशल मिडीयावर सातत्याने हेटाळणीचा विषय बनलेले अरविंद केजरीवाल हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचं एका सर्व्हे करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. I-PAC नावाच्या राजकीय सल्ले देणाऱ्या एका कंपनीने हा सर्व्हे केला असून पहिल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केजरीवाल यांच्यानंतर सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचा नंबर आहे तर तिसरा नंबर ओडिशाच्या नवीन पटनायक यांचा आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधअये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे निवडणुका होणार असून या तीन राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याला या यादीत स्थान न मिळणं ही भाजपसाठी चिंतेची बाब असल्याचं मानलं जात आहे.

हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता. ज्यात ८ वर्षांवरील नागरिकांनी सहभाग घेतला होता असं या कंपनीचं म्हणणं आहे. देशभरातील जवळपास ७५३६ महाविद्यालये  या सर्वेक्षणात सहभागी झाली होती असं आयपॅकचं म्हणणं आहे.

टॉप ३ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपला स्थान मिळालं नसलं तरी या सर्वेक्षणातून मोदी हे राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्यापेक्षा बरेच पुढे असल्याचंही दिसून आलंय, जी भाजपसाठी दिलासादायक बाब ठरू शकते.