‘दहा हजार महिलांसोबत लैंगिक संबंध’, कुस्तीपटूचा दावा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मधील महान कुस्तीपटू रिक फ्लेअर याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. रिकने दावा केला आहे की त्याने आतापर्यंत १० हजार महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवले आहेत. मंगळवारी ईएसपीएन या वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या एका माहितीपटामध्ये त्याने हे म्हटले आहे.

माहितीपटामध्ये रिकला तुझे किती महिलांसोबत शारीरिक संबंध आहेत असे विचारण्यात आले तेव्हा त्याने कदाचित १० हजार, असे उत्तर दिले. तसेच लग्नाबाबत विचारले असता, मी एकदाच लग्न करण्याचा विचार केला होता. मी त्याबाबत विचार केला, तसे करण्याचाच प्रयत्न केला. मात्र मी याबाबतीत अपयशी ठरलो. रिकला चार मुले असून चार वेळा त्याचा घटस्फोटही झाला आहे.

रिक मूळचा अमेरिकेतील मिनीसोटामधील रहिवासी आहे. रिकला नेचर बॉय या नावाने देखील ओळखले जाते. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मध्ये तो एकमेव असा कुस्तीपटू आहे ज्याला ‘हॉल ऑफ फेम’मध्ये दोनदा सहभागी करण्यात आले होते. रिक १६ वेळा वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन राहिला आहे. १९८०च्या दशकामध्ये कुस्तीच्या दुनियेत रिकचे मोठे नाव होते. कुस्तीमुळे त्याला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली.