कामासाठी पुरुषांनीही मला शैय्यासोबत करायला सांगितली!

सामना ऑनलाईन, मुंबई

शरीरसुख दिलं तरच चित्रपटसृष्टीमध्ये देऊ असं धमकावत लैंगिक शोषण केल्याचा आरोप हॉलीवूडचा निर्माता हार्वी वायंस्टीनवर करण्यात आला आहे. असे प्रकार फक्त महिलाच नाही तर पुरुषांसोबतही होत असतात आणि मलाही शय्यासोबत करण्यासाठी विचारण्यात आलं असल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेता इरफान खान याने केला आहे. शरीरसुखाची मागणी पुरुष आणि महिला दोघांनी केल्याचंही त्याने म्हटलं आहे. ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्याने हा खुलासा केला आहे.

इरफान खान याने म्हटलंय की हे प्रकार महिलांसोबत अधिक होतात. मात्र याला नकार देता येऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे. मात्र जेव्हा एखादी व्यक्ती जबरदस्ती करायला लागते तेव्हा ते निंदनीय असून त्याच्याविरोधात आवाज उठवलाच पाहीजे असं इरफान खान म्हणाला आहे. हार्वी वायंस्टीन हा हॉलीवूडमधला तगडा निर्माता मानला जातो आणि त्याच्यावर आजपर्यंत डझनापेक्षा जास्त अभिनेत्रींचा लैंगिक छळ केल्यानंतर त्यांना काम दिल्याचा आरोप आहे.