नेहमीच ‘दबंग’चा हिस्सा राहणार : सोनाक्षी सिन्हा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘दबंग’ आणि ‘दबंग-२’ असे दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘रज्जो (दबंगमध्ये सोनाक्षीचे नाव) नेहमीच दबंगचा एक भाग असेल. छोटी भूमिका असेल तरीही मी या सिनेमात काम करेन’ असे म्हटले आहे. ‘मला चित्रपटात पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल सलामानचे धन्यवाद मानते’ असेही तिने म्हटले आहे. २०१०मध्ये आलेल्या ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पुढील वर्षी ‘दबंग’ सीरीज़चा आणखी एक चित्रपट सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.

सोनाक्षी सिन्हा पुढील वर्षी येणाऱ्या ‘दबंग’ चित्रपटाच्या सिरिजमध्ये काम करणार नसल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. यावर सोनाक्षीने काही लोक अफवा पसरवत आहेत. अशा अफवांमुळे मी आणि सलमान खूप हसत असल्याचेही तिने सांगितले आहे. सुरुवातीला नायकप्रदान चित्रपट करण्याबद्दल सोनाक्षीवर टीका करण्यात आली होती. मात्र, या चित्रपटात काम केल्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे तिने म्हटले आहे.