… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ‘चलते चलते’ या चित्रपटातून ऐश्वर्याला डच्चू देऊन तिच्या जागी राणी मुखर्जीची वर्णी लावली होती. शाहरुखचा हा निर्णय ऐश्वर्याच्या अक्षरश: वर्मी बसला होता. त्यामुळे अनेक वर्ष त्या दोघांमधून विस्तव जात नव्हता. त्यामुळे ऐश्वर्याची कडक सासू जया बच्चन देखील शाहरुखवर भडकली होती. त्या दरम्यान एका मुलाखतीमध्ये जया यांनी त्याचा राग व्यक्त करत मी शाहरुखच्या कानाखालीच मारली असती असे म्हटले होते. जया बच्चन यांची ती मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

शाहरुखने चलते चलते मधून ऐश्वर्याला डच्चू दिल्यानंतर कतरिना कैफ हिच्य़ा वाढदिवसाच्या पार्टित देखील ऐश्वर्याबाबत काही चुकीची वक्तव्य केली होती. त्यानंतरच काही दिवसांनी जया बच्चन यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने ऐश्वर्यासोबत जे केले व त्यानंतर तिच्याविषयी जे वक्तव्य केलं त्याविषयी मला त्याच्यासोबत कधी चर्चाच करत आली नाही. मात्र जर कधी शाहरुख माझ्या घरी आला असता तर त्याला मी माझ्या मुलाला मारते तशी एक कानाखाली मारली असती’ असे जया बच्चन यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

जया बच्चन व शाहरुख खान यांनी कभी खुशी कभी गम या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात जया बच्चन  यांनी शाहरुखची आई व अमिताभ बच्चन यांनी त्याच्या वडिलांची भूमिका केली होती.