अभिनंदन यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने होणार सन्मान, हवाई दलाची शिफारस

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानविरोधात शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारने सन्मान होणार आहे. हवाई दलाने तशी शिफारस संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानन पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न हाणून पाडत वायुसेनेने पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावले होते. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाने पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे एफ-16 विमान पाडले होते. या चकमकीदरम्यान अभिनंदन यांचेही विमान कोसळले आणि ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानमध्ये उतरले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले परंतु हिंदुस्थानच्या दबावानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांची सुटका करण्यात आली होती.