सुरक्षेच्या कारणास्तव अभिनंदन यांची श्रीनगरमधून बदली

3
wing-commander-abhinandan-v

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानच्या तावडितून सुटका झालेले हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुरक्षेच्या कारणास्तव बदली करण्यात आली आहे. कश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये अभिनंदन यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांना पश्चिमेकडील एका हवाई तळावर पाठविण्यात आले आहे. त्यांना कोणत्या हवाई तळावर पाठविण्यात आले आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

अभिनंदन! वीर जवान पुन्हा उड्डाणासाठी सज्ज

अभिनंदन यांनी हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाचा पाठलाग करत ते 27 फेब्रुवारीला पाडले होते. त्यांनी धाडसाने ही कारवाई करत इतिहास घडवला होता. अभिनंदन असलेल्या मिग 21 बाइसन या लढाऊ विमानाने एफ 16 पाडण्याची ही पहिलीच घटना होती. त्यांनी पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्यानंतर त्यांच्या विमानालाही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे विमान सोडून ते पॅरोशूटने बाहेर पडले. मात्र, पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली होती. त्यानंतर 1 मार्चला पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.