मेधा गाडगीळ यांची बदली

11


सामना प्रतिनिधी । मुंबई

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळात अध्यक्ष म्हणून बदली करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. गेल्या आठवडय़ात 20 आयएएस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केल्यानंतर सरकारने आज आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. निधी पांडे यांची नेमणूक वित्तीय महामंडळात सदस्य सचिव म्हणून करण्यात आली तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किशोरराजे निंबाळकर यांची बदली मंत्रालयात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. मेधा गाडगीळ या राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत होत्या पण त्यांना डावलून मुख्य सचिवपदी दिनेशकुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य सचिवपदावर नियुक्ती न झाल्यामुळे मेधा गाडगीळ नाराजही होत्या पण तरीही मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यात मेधा गाडगीळ यांनी चांगले प्रयत्न केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या