Jemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

13


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेनंतर जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारी हिंदुस्थानची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने मोठी झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने 4 स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला असला तर खेळाडूंनी केलेल्या दमदार प्रदर्शनाचे बक्षिस त्यांना जागतिक क्रमवारीत मिळाले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत जेमिमा रॉड्रिग्सने तीन सामन्यात 132 धावा चोपल्या होत्या. याचाच फायदा तिला जागतिक क्रमवारीत झाला. जेमिमा रॉड्रिग्ससह सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने देखील चार स्थानांची झेप घेत सहावा क्रमांक मिळवला आहे. या मालिकेत स्मृती मंधानाने 182 धावा केल्या होत्या.

गोलंदाजीमध्ये फिरकी खेळाडू राधा यादवने 18 स्थानांची झेप घेत 10 वे स्थान पटकावले आहे, तर दीप्ती शर्मा 14 व्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या