माजी विजेते भिडणार, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानमध्ये आज लढत

47

सामना ऑनलाईन । टाँटन

पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ आणि 1992 साली वर्ल्ड चॅम्पियन झालेला पाकिस्तानी संघ यांच्यामध्ये उद्या येथे खडाजंगी रंगणार आहे. ऍरोन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तान व वेस्ट इंडीजला हरवल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून त्यांना निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानला सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीजकडून हार सहन करावी लागली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा जेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार इंग्लंडला 440 व्होल्टचा झटका दिला. पण श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही संघ विजयासाठी जिवाचे रान करताना दिसणार आहेत.

स्टोयनीसला दुखापत, मार्शची एण्ट्री

अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोयनीसला दुखापत झाली असून त्यामुळे तो उद्याच्या लढतीत खेळणार नसल्याचे कर्णधार ऍरोन फिंचकडून सांगण्यात आले. तसेच यावेळी त्याची दुखापत बळावल्यास पर्यायी खेळाडू म्हणून मिचेल मार्शलाही इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले आहे.

पुन्हा येणार पावसाचा व्यत्यय

पावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्ड कपमधील रंगत निघून जात आहे. क्रिकेटप्रेमींचाही हिरमोड होत आहे. या आठवडय़ात टाँटन येथे पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल्यामुळे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान लढतीतही पाऊस हजेरी लावणार हे निश्चित.

n खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज चमकणार

न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेल्या येथे झालेल्या लढतीत जिमी नेशामच्या गोलंदाजीसमोर आशियाई संघातील फलंदाजांची डाळ शिजली नाही. उद्याही तेथे ढगाळ वातावरण असल्यामुळे रेगवान गोलंदाज चमकतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहब रियाझ, मोहम्मद आमीर, हसन अली या पाकिस्तानी गोलंदाजांसह मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन कुल्टर नाईल या कांगारू संघातील गोलंदाजांनी आपली धमक दाखवल्यास आश्चर्य वाटणार नाही.

उभय संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी

एकूण सामने …..  103

पाकिस्तान विजयी  32

ऑस्ट्रेलिया विजयी  67

रद्द ………………….  3

टाय ………………… 1

वर्ल्ड कपमधील उभय संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी

एकूण सामने ………  9

पाकिस्तान विजयी  4

ऑस्ट्रेलिया विजयी .  5

इंग्लंडमधील उभय संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी

एकूण सामने ………  8

पाकिस्तान विजयी  3

ऑस्ट्रेलिया विजयी .  5

आजची लढत – ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान टाँटन, दुपारी 3 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या