हे काम करा आणि जियोचा डेटा मोफत मिळवा

2498

सामना ऑनलाईन । मुंबई

टेलिकॉम आणि इंटरनेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या जियो या कंपनीने आतापर्यंत ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. आता यात अजून एक भर पडणार आहे. तुम्ही जियोचे ग्राहक असाल आणि तुम्हाला २ महिन्यांचा इंटरनेट डेटा हवा असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल.

रिलायन्स जियोने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. त्यासाठी त्यांनी आयसीआयसीआय बँकेसोबत भागीदारी केली आहे. जे ग्राहक जियोचे पोस्टपेड ग्राहक असतील आणि आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ऑफरचा फायदा मिळू शकतो. जियो पोस्टपेड ग्राहकांना त्यांच्या वार्षिक बिलावर दोन महिन्यांचा डेटा मोफत मिळणार आहे. तसंच या ऑफरवर कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे.

ही ऑफर अॅक्टिव्ह करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरून ऑटो पे या पर्यायावर साईन अप करावं लागेल. त्यानंतर माय जियो अॅपवर जाऊन जियो पे हा पर्याय स्वीकारावा लागेल. त्यानंतर ऑटो पे हा पर्याय स्वीकारला की क्रेडिट कार्डाचे डिटेल्स दिल्यानंतर आपोआप पैसे कापले जातील. ही सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना १९९ रुपयांपासून सुरू होणारे प्लान्स निवडावे लागतील. त्यात अनलिमिटेड कॉलिंग, २५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस प्रतिदिन मिळेल.

summary- icici credit card holder can get free jio data

आपली प्रतिक्रिया द्या