केंद्राचे पथक पावले तर…शेतकऱ्याच्या पदरात ‘हे’ पडू शकते

सामना प्रतिनिधी । बीड

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांसह राज्यात दुष्काळ जाहीर झाला मात्र अद्याप या दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने कोणताच आधार दिला नाही. केंद्रसरकार कडे सात हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली. त्यासाठीच केंद्राचे पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे. या पथकाचा अहवाल समाधानकारक गेल्यास आणि केंद्राने मदतीचा हात दिल्यास दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात बरेच काही पडू शकते.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्राचे पथक उद्या मुबई कडे रवाना होईल दोन दिवसांच्या या पाहणी दौऱ्यात पथकाने मराठवाडा पालथा घातला हे पथक आपला अहवाल केंद्राकडे सुपूर्द करणार आहे . या अहवाला नंतर केंद्र सरकार महाराष्ट्र तील दुष्काळाचा सामना करण्यासाठी मदतीचा ओघ सुरू करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे , सात हजार कोटी रुपयाच्या मदतीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे .मदत लवकर मिळाल्यास दुष्काळी भागात मदतीचा हात आणी उपाय योजना राबवल्या जातील दुष्काळाच्या संकटात धीर देण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अनेक पातळीवर मदत मिळू शकेल,असा अंदाज वरिष्ठ पातळीवर व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते

 • शेतसारा माफ
 • यंदाचे पीक कर्ज माफ
 • विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्क माफ
 • अल्पभूधारक शेतकऱ्याच्या वीज बिल माफ
 • खरिप हंगामाचा पीक विमा मिळेल
 • जनावरांसाठी चारा छावण्या
 • अन्न धान्य पुरवठा होईल
 • पाणी पुरवठासाठी मागेल त्या गावात टँकर
 • मागेल त्यास हाताला काम मिळेल
 • रोहयो हाताला काम देण्याचा कालावधी वाढेल
 • चारा लागवडीसाठी बियाणे मोफत
 • अनुदान विहिरीची संख्या वाढवली जाईल
 • मागेल त्याला शेततळे आणी तातडीने अनुदान
 • बंधारे बांधल्या जातील
 • पाणी व्यवस्थापन राबवले जाईल
 • कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जातील
 • फळबागांना अनुदान दिले जाईल