काँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत

1
harish-rawat

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राम मंदिराबाबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीश रावत यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस सत्तेवर आली तरच राम मंदिर होईल असे रावत म्हणाले. एका पत्रकार परिषदेत ते बोलते होते. रावत म्हणाले की, “मर्यादेचे उल्लंघन करणारी भाजप असून जे मर्यादा नष्ट करतात ते मर्यादा पुरुषोत्तमचे भक्त होऊ शकत नाही. आम्ही मर्यादा स्थापन करणारे लोक असून संविधानाचा आदर करणारे आम्ही आहोत.” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

रावत पुढे म्हणाले की, “जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बनेल.” राम मंदिराबाबत संघानेही वक्त्यव्य केले होते. संघाने अयोध्येत राम मंदिर निर्माणाची तारीख सांगितली होती. भैय्याजी जोशी म्हणाले होते की, “अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी आमची इच्छा आहे. हे मंदिर २०२५ पर्यंत पूर्ण झाले पाहिजे पुढे, सरकारला ठरवायचे आहे.” तसेच आज जर मंदिर बनवण्यास सुरूवात झाली तर ते पुढील पाच वर्षात पूर्ण होईल असेही जोशी यांनी नमूद केले.