तंदुरुस्त राहायचंय, मग चांगले विचार करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर भरपेट जेवणं करणं जितकं महत्वाचं तितकचं चांगले विचार करणं गरजेचं आहे. यामुळे तंदुरुस्त राहायच असेल तर सर्वात आधी सकारात्मक व चांगले विचार करायला शिका असा सल्ला टेक्सास येथील शास्त्रज्ञ एरिक स्टाइस यांनी दिला आहे.

think-positve-2

टेक्सास येथे ‘द बॉडी प्रोजेक्ट’ या थीमवर फ्लोरिडातील काही शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. यात सगळ्यांना आरशासमोर उभे राहून स्वतःमधील चांगले गुण ओळखण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या प्रयोगात त्यांना न आवडणारे पेहराव घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सर्वांचं परीक्षण करण्यात आलं. यात ज्यांनी स्वतःबद्दल खूप चांगलं सांगितलं होतं त्यांचे विचार सकारात्मक असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. केवळ चांगले विचार केल्यामुळेच ते आनंदीत राहू शकत असल्याचं शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं. त्या तुलनेत नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीं अनेक व्याधींनी ग्रस्त होत्या असे स्टाइस यांनी सांगितलं आहे.