‘रिव्हेज पोर्न’पासून वाचायचंय? मग फेसबुकला न्यूड फोटो द्या!

सामना ऑनलाईन । सिडनी

महिलेसोबत असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर किंवा आवडती व्यक्ती मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्याला आयुष्यातून उध्वस्त करण्यासाठी काही पुरूष कोणत्याही थराला जातात. यात सुडाच्या भावनेने पेटलेल्या पुरूषाने त्यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ किंवा फोटो मॉर्फ करून सोशल साईटवर टाकण्याचे अनेक संतापजनक प्रकार उघड झाले आहेत. याच विकृतीला ‘रिव्हेज पोर्न’ असे म्हणतात. सोशल साईटवर अपलोड केलेला हा व्हिडिओ क्षणात कोट्यवधी लोकांपर्यंत वेगाने पसरला जातो आणि त्यामुळे संबंधीत व्यक्तीला प्रचंड मानसिक तान सहन करावा लागतो. अशा ‘रिव्हेज पोर्न’पासून वाचण्यासाठी फेसबुक मदत करणार आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारच्या ई-सेफ्टी नावाच्या संस्थेने ‘रिव्हेज पोर्न’पासून वाचण्यासाठी असे पाऊल उचलण्याचा प्रयोग केला आहे. याबाबत ऑस्ट्रेलिया फायनान्सने दिलेल्या रिव्हूनुसार, ‘रिव्हेज पोर्न’पासून वाचण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ई-सेफ्टीच्या आयुक्तांशी संपर्क करावा लागणार आहे. त्यानंतर मेसेंजरच्या मदतीने आपला एक फोटो स्वत:लाच पाठवाला लागेल. तुम्ही असे केल्याने फेसबुकला तुमच्या फोटोची डिजिटल फिंगरप्रिंट करण्याची संधी मिळेल.

याबाबत अधिक माहिती देताना ई-सेफ्टीचे आयुक्त इनमान ग्रांट यांनी सांगितले की, मेसेंजरच्या मदतीने आपला एक फोटो स्वत:लाच पाठवणे म्हणजे स्वत:लाच मेल करण्यासारखे आहे. दुसऱ्याला फोटो पाठवण्यापेक्षा स्वत:ला फोटो पाठवणे सर्वात सुरक्षित माध्यम आहे. हा फोटो स्टोअर केला जाणार नाही, तर त्याची लिंक स्टोअर केली जाईल. फोटो मॅचिंग या तंत्रज्ञानाच्या मदतीने या फोटोची लिंक सेव्ह केली जाईल. फोटो सेव्ह केल्यानंतर त्याची डिजिटल फिंगरप्रिंट तयार करण्यात येईल.

डिजिटल फिंगरप्रिंट तयार झाल्याने कोणी तुमचा अश्लिल फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही. तसेच स्वत:लाच आपला न्यूड फोटो पाठवल्यानंतर तो फोटो मेसेंजरमधून डिलिट करण्याचा सल्लाही ई-सेफ्टीकडून देण्यात आला आहे. हा प्रयोग सध्या फक्त ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात येत असून लवकरच युके, कॅनडा आणि अमेरिकेमध्येही याची चाचणी घेण्यात येणार आहे.