सुख म्हणजे… यंदा सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता!

rain-12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पावसाची वाट जेवढ्या आतूरतेने शेतकरी वर्ग पाहात असतो, तितक्याच आतूरतेने त्यांच्याविषयी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाचीही वाट पाहिली जाते. शेतकऱ्यांबरोबरच साऱ्या देशाला सुखावणारी बातमी म्हणजे यंदा सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता आहे. स्कायमेटने सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आधी वर्तवली होती त्यामुळे थोडी चिंता निर्माण झाली होती. मात्र हवामान विभागाने दिलेली बातमी नक्कीच दिलासा देणारी आणि सुखावून सोडणारी आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के आहे. तर सरासरी इतक्या पावसाची शक्यता ही 39 टक्के आहे. अती पर्जनवृष्टीचे शक्यता अवघी दोन टक्के आहे. तसेच दुष्काळाची शक्यता 17 टक्के वर्तवण्यात आली आहे.

अल-निनो वादळाचा प्रभाव यंदा जरी पाहायला मिळाला तरी जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. जुलै-ऑगस्ट दरम्यान पाऊस चांगला असेल. या दरम्यान पर्जन्यमानावर त्याचा तितकासा परिणाम दिसणार नाही. ऑगस्टनंतरच्या पावसावर अल निनोचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.