सुगंधी चाफा

> चाफ्याचे फूल हे शीतल प्रवृत्तीचे असून हृदयासाठी उपयुक्त मानले जाते. त्याचा सुगंध घेतल्यास हृदय आणि बुद्धी तल्लक होते.

> दोन चाफ्याच्या फुलांचा लेप जळजळ होणाऱ्या ठिकाणी लावल्यास जळजळीवर आराम मिळतो.

> चाफ्याचे फूल मधामध्ये एकत्र करून खाल्ल्यास ताकद मिळते.

> हाता, पायांना चाफ्याच्या फुलांच्या तेलाने दुखण्यावर, मुरगळलेल्या ठिकाणी मालीश करा.

> डोकेदुखीचा त्रास असल्यास चाफ्याच्या फुलांचा अर्क तिळाच्या तेलात एकत्र करून तो लेप डोक्याला लावा. त्यावर एखादा कपडा बांधा. आराम मिळेल.

> संधीवाताचा त्रास असलेल्यांनी चाफ्याच्या फुलांच्या तेलाने मालीश केल्यास आराम मिळतो.

> पोट दुखत असल्यास चाफ्याच्या पानांचा रस दहा मिली घेऊन 20 ग्रॅम मधात एकत्र करून सकाळ, संध्याकाळ घेतल्यास फायदा होतो.

> अतिसार, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास चाफ्याच्या झाडाच्या मुळांचा काढा त्यावर प्यावा, आराम मिळतो.

> चाफ्याच्या फुलांचा रस काढून तो तीन मिली घेऊन मधासोबत घ्यायचे, पोट साफ होते.

> रक्तशुद्धीसाठी चाफ्याच्या झाडाच्या सालाचे तीन ग्रॅम चुर्ण दिवसातून दोन वेळा घेतल्यास रक्त शुद्ध होते.

> चाफ्यामध्ये भूक कमी करणारे घटक आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

> पोटाचे दुखणे जाणवत असल्यास चाफ्याच्या फुलांचा काढा बनून प्यायल्यास पोटाचे आजार बरे होतात.

> चाफ्याची फुले वाटून पाणी किंवा लिंबाच्या रसात मिसळून  लावल्यास चेहरा चमकदार आणि स्वच्छ होतो.

> त्वचेच्या कुठल्याही समस्येवर फुलांचा लेप लावल्यास परिणाम जाणवतो.