बहुगुणी पुनर्नवासव

22

पुनर्नवा ही औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून पुनर्नवासव बनवले जाते. ज्येष्ठासाठी हे आसव अत्यंत प्रभावी आहे.

 • पुनर्नवा पोटाच्या संबंधीत आजार दूर करते. अपचन, पोटामध्ये आवश्यक अमलाची कमी इत्यादी समस्या दूर करते.
 • सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी पुनर्नवासवाचे सेवन करावे. त्याने आराम मिळतो. हे कोणत्याही प्रकारच्या संधीवातामध्ये उपयोगी ठरते.
 • थकवा जाणवत असल्यास पुनर्नवासव घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हे मांसपेशी मजबूत करते. .
 • कोणत्याही प्रकारचे त्वचाविकार, जखमेचे डाग, त्वचेवरील खुणा यावर पुनर्नवाची मुळं वाटून वाटून त्याचा लेप लावावा. काही दिवसांतच फरक जाणवतो.
 • रक्तातील विषारी घटक दूर करण्यासाठी पुनर्नवासव घेतले तर अनेक आजारांपासून दूर राहता येते.
 • पुनर्नवाचे नियमित सेवन केल्यास मूत्रप्रवाह सुरळीत राहतो. ज्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते.
 • कर्करोगाच्या रुग्णांसाठी पुनर्नवा एक संजीवनी आहे. कारण हे नवीन पेशी बनवते. या नवीन पेशी कर्करोगाशी लढण्यास शक्ती प्रदान करतात.
 • अर्धांगवायुमुळे शरीराचा एखादा भाग सुन्न पडला असेल किंवा मांसपेशी कमजोर झाल्या असतील तर ही समस्या पुनर्नवाच्या सेवनामुळे दूर होते.
 • पुनर्नवा अतिरिक्त चरबी कमी करते तसेच अशक्त, दुबळेपणाही कमी करते. .
 • डोळ्यामधून पाणी येणे, खाज सुटणे अशा समस्या असतील तर पुनर्नवाची मुळे दूध किंवा मधामध्ये घासून डोळ्यांना काजळ लावतो त्याप्रमाणे लावावे.
 • 10 ग्राम भारंगमूल चूर्ण, 10 ग्रॅम पुनर्नवा चूर्ण आणि 300 मि.ली. याचा पाणी उकळकून काढा बनवा. 50 मिली. काढा शिल्लक राहील. हा काढा सकाळ-संध्याकाळ घ्यावा. यामुळे दम्याच्या विकारात आराम मिळतो.