ई जीवनसत्त्व घ्या!

18
  • शरीरात ‘ई’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे केस गळतात. अशावेळी ‘ई’ जीवनसत्त्वाच्या दोन कॅप्सुल दररोज घेतल्यास केसगळतीची समस्या दूर होईल.
  • दररोज ‘ई’ जीवनसत्त्वाची कॅप्सूल घेतल्यास त्वचेच्या तक्रारी दूर होतील. किमान महिनाभर या गोळ्या घ्यायला हव्यात.
  • ताणतणाव किंवा नैराश्य सतावत असेल तर ‘ई’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या प्रभावी आहेत. तणाव जाणवत नाही.
  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास या दोन गोळ्या घेतल्याने ही कमतरता दूर होते. मुलींनी रोज या दोन गोळ्या घ्यायला हव्यात.
  • ‘ई’ जीवनसत्त्व त्वचा कोरडी होण्यापासून रोखते आणि ती चमकदार बनवते. झोपण्यापूर्वी दररोज बदाम आणि नारळ तेलात ते मिसळून घ्या. थंडीत मॉईश्चरायजर वा लोशन म्हणूनही या कॅप्सूल्सचा वापर करावा.
  • अतिरिक्त वजन कमी करता तेव्हा त्वचेवरील स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ही कॅप्सूल्स लाभदायक ठरतात. बदाम किंवा खोबरेल तेलात मिसळून लावल्याने स्ट्रेच मार्क्स जाण्यास मदत होते.
  • ‘ई’ जीवनसत्त्वाच्या कॅप्सूल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घेतला पाहिजे.