आरोग्यदायक केळीचे पान

उपवासाचे जेवण असो किंवा नैवेद्य दाखवायचा असो तो केळीच्या पानातच दाखवला जातो. पण धार्मिकतेसोबतच केळीच्या पानाचे आरोग्यदायीही महत्त्व जाणून घेऊया….

> केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्र्ाानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते.

> केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात.

> ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे अशांनी केळीच्या पानात जेवलेले फार चांगले असते.

> केळीच्या पानातील पॉलिफेनॉल नावाचा घटक नैसर्गिक ऍण्टीऑक्सिडंट म्हणून काम करतो. यामुळे त्वचा दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते.

> त्वचेचा आजार असल्यास केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळायचे. फरक दिसेल.

> सुकलेल्या केळीच्या पानांचा चुरा चहात टाकून घेतल्यास फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.