तोतया सीबीआय अधिकाऱ्याने लावला ८५ लाखांचा चुना

सामना प्रतिनिधी । ठाणे

सीबीआयमध्ये एसपीजीचा हेड असल्याची बतावणी करून एका भामट्याने सहा जणांना सुमारे ८५ लाख ५० हजार रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी आरोपी अनंतप्रसाद पांडे याच्यासह त्याची पत्नी व मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनंतप्रसाद याने फिर्यादी महेश पालीवाल याच्याकडून एफएलचे लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने १६ लाख २६ हजार रुपये घेतले. तसेच त्याचे नातेवाईक खिबचंद सेवानी यांना म्हाडाच्या दुकानाचे आमिष दाखवून तब्बल ५० लाख उखळले, तर कांतीलाल पटेल यांना रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये स्टॉल घेऊन देण्याचे स्वप्न दाखवत ३ लाख घेतले. इतकेच नव्हे तर भरत पटेल व केतन पटेल यांच्या चार नातेवाईकांना रेल्वेत टीसी पदावर लावण्यासाठी १८ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. मात्र पैसे घेऊन वर्ष उलटले तरी यापैकी कोणतेच काम न झाल्याने अखेर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.