दोन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

jail-1

सामना प्रतिनिधी । नगर

कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्या प्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना दोषी धरुन त्यांना सक्तमजूरीची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. एस. नावंदर यांनी ठोठावली आहे.

आरोपींमध्ये आरोपी रमेश सावत्या भोसले व आत्मशा सावत्या भोसले यांचा शिक्षेमध्ये समावेश आहे.
दि.18 जुलै 2009 रोजी नगर पुणे महामार्गावर कांमरगाव शिवारातील हॉटेल रानवारा येथे पोलीस कॉस्टेबल भाऊसाहेब काळे व त्यांचे साथीदार कर्मचारी तसेच ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवकांसह त्या रोडवर नेहमी प्रमाणे होणार्‍या लुटमारीला प्रतिबंध करण्यासाठी गेले आसता जीप क्रमांक एम.एच.16 ई.650 मधुन नगर पुणे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना आरोपी रमेश भोसले व आत्मशा भोसले, गोट्या भोसले, तारामल भोसले यांनी जबरी चोरी करण्याचे उद्देशाने फिर्यादी व साथीदार यांचे गाडीवर हल्ला केला होता.