उघडा डोळे ,बघा नीट.., काय पाजताय ? बीड जिल्ह्यातील तहानलेल्या लोकांना.

219
water-cutting

सामना प्रतिनीधी । बीड

दुष्काळ उपाययोजनासाठी पाण्यासारखा पैसा पाण्यात घालूनही शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळू शकेना, केवळ टँकर ने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नाही तर शुद्ध पाणी पुरवठा करण्याची सरकार ची जबाबदारी आहे, तहानलेल्या लोकांना बेंदाड पाजण्याचे काम होत आहे, कुठे आहे प्रशासन? कुठे आहे यंत्रणा असा सवाल उपस्थित होत आहे.

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्थाना आधार देण्यासाठी आणि उपाययोजना साठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे, एवढा खर्च करूनही दुष्काळ ग्रस्ताना मदतीचा हात पोहोचतोय का ? यासाठीच प्रशासकीय यंत्रणा आहे, छावणीत भ्रष्ट्राचाराचा तमाशा सुरू आहे, टँकर माफिया धूळफेक करत आहे, टँकर च्या खेपा कशा वाढतील याचा प्रयत्न सुरू आहे, टँकर ने पाणी आणले जात आहे पण हे पाणी कोठून आणले जात आहे, पाणी कसे आहे हे तपासण्याचे काम कोणाचे ? ज्या पाण्याने अंघोळ ही करावी वाटणार नाही ते पाणी गोरगरीब आणी दुष्काळात हतबल झालेल्या लोकांच्या खशात टाकले जात आहे, धरणे तळाला लागली, वर्षानुवर्षे तळ्यात साचलेली घाण वर आली , तळ्यात दुर्गंधी सुटली त्याच तळ्यात थेट विद्युत पंप टाकून पाणी टँकर मध्ये भरले जात आहे, तेच पाणी गावागावात पिण्यासाठी पोहोचले जात आहे याचं गढूळ आणी बेदाड युक्त पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे , पाणी कसे मिळत आहे या पेक्षा पाणी मिळत आहे ना यात लोक समाधान मानत असले तरी दुर्गंधी युक्त पाण्यामुळे आजार पसरत आहेत त्वचेचे आजार डोके वर काढत आहे, केवळ टँकर ने पाणी पुरवठा करण्याची सरकारची जबाबदारी नाही तर स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे, टँकर माफिया प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत आहे, शेकडो गावात असे पाणी पुरवले जाते, केवळ तपासणी करून उपयोग नाही ,प्रशासनाने कारवाई निर्णय घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या