पीएम होण्यापूर्वी सॉरी म्हणा, निवडणूक आयोगाचा इम्रान खानला आदेश

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान याचा तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदावर टांगती तलवार असली तर पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना माफी मागावी लागणार आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने (ईसीपी) भडकवणारे भाषण देणे आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर लगावला असून या प्रकरणी लिखित मागी मागावी असा आदेश दिला आहे.

निवडणूक आयोगाने इम्रान खान याचे वकील बाबर अवान यांना सांगितले की, इम्रान खान यांनी शुक्रवारपर्यंत माफिनामा दाखल करावा. या माफिनाम्यावर इम्रान खान यांचे हस्ताक्षर असावे असेही सांगितले आहे. इम्रान खान यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर करणे, भडकवणारे भाषण देणे आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे दोन प्रकरणं न्यायालयात दाखल आहे.