गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घालणार

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मद्यपान करून अनेकदा काही लोक गोंधळ घालत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

त्यासाठी अबकारी नियमांमध्ये काही बदल करण्यात येतील असेही ते म्हणाले. पणजीतील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. नियमांमध्ये बदल करून ऑक्टोबरमध्ये याबाबतची अधिसूचना काढण्यात येईल, असे ते म्हणाले. याआधी गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर मद्यपानास बंदी घालण्यात आली आहे.