विजयाने पाकड्यांची डोकी फिरली, पत्रकाराच्या डोक्यात गोळी घातली

सामना ऑनलाईन। कराची

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने हिंदुस्थानचा दारुण पराभव केल्याने पाकड्यांची डोकी फिरली आहेत. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी रविवारी रात्री मोठ्या संख्येने कराचीत नागरिक रस्त्यावर उतरले. हवेत अंदाधुंद गोळीबार करत अनेकजण आनंद साजरा करत असतानाच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्या घराबाहेर लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या एका पत्रकाराच्या डोक्यात एक गोळी घुसली. यावेळी उडालेल्या गोंधळात १२ जण जखमी झाले आहेत.

रविवार सकाळपासूनच पाकिस्तानमध्ये हिंदुस्थान हरणार अशी चर्चा होती. अनेकांनी पैजाही लावल्या होत्या. हिंदुस्थान हरणार हे स्पष्ट होताच कराचीतील रस्त्यावर लोक मोठ्या संख्येने उतरले. तरुणांनी मोटारबईकवरुन रॅलि काढण्यास सुरुवात केली होती. हिंदुस्थान हरल्यानंतर पाकड्यांचा उत्साह अधिकच वाढला.

कराचीतील ज़ीमाबाद, नेपियर आणि जमशेद क्वार्टर रोडवर तर आनंदाने डोकी फिरलेल्या काही पाकड्यांनी त्यांना झालेला आनंद लोकांना कळावा यासाठी हवेत गोळ्या झाडायला सुरूवात केली. पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदच्या घराबाहेरच हा सगळा तमाशा सुरू होता. या गोळीबारात एक गोळी सर्फराजच्या घराबाहेरून रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराच्या डोक्यात घुसली. यानंतर जो गोंधळ उडाला त्यामध्ये १२ जण जखमी झालेत. पत्रकाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.