जम्मू-कश्मीरच्या शाळांमध्ये शिकवला जातो ‘स्वतंत्र’ भूगोल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण दिलं जात असल्याची माहिती खुद्द हिंदुस्थानचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे. अशा शिक्षणातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कश्मीरमधल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदुस्थानचा नकाशा वेगळा आणि जम्मू-कश्मीरचा नकाशा वेगळा असं शिक्षण दिलं जात आहे. अशा प्रकारचे शिक्षण दिले जाऊ नये, असे स्पष्ट मत रावत यांनी व्यक्त केले. असे दोन वेगळे नकाशे कशासाठी? दोन नकाशे दाखवून विद्यार्थ्यांना नक्की कोणतं शिक्षण द्यायचं आहे?, असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

महत्वाची बाब म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजप सत्तेत आहे. मात्र भाजपच्या मंत्र्यांनी हा प्रश्न लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीत योग्य तो बदल का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.