सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे 31 ऑक्टोबरला अनावरण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज येथे सांगितले.

या पुतळ्याची उंची तब्बल 182 मीटर असून जगामधील हा सर्वात उंच पुतळा असल्याचा गुजरात सरकारचा दावा आहे. गुजरातमधील सरदार सरोवराच्या लगत हा पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा म्हणजे देशाचे ऐक्य, एकात्मता यांचे प्रतीक आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा पुतळा उभारण्याची घोषणा 2013 मध्ये केली होती.

summary- inauguration of sardar patel’s statue on 31st october