करदाते 50 टक्क्यांनी वाढले

47

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्ष 2018-19 मध्ये इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहितीही चंद्रा यांनी दिली. या वर्षी सुमारे 6.08 कोटी रूपये कर जमा झाला आहे. कर भरण्याविषयी केलेल्या जाहिरात अथवा प्रदर्शनाचा चांगला परिणाम करदात्यांवर झाला आहे.

सीबीडीटीने चालू वर्षात कर न भरणाऱ्या सुमारे दोन कोटी करदात्यांना एसएमएस पाठवून कर भरण्याचे आवाहन केले. महसूल विभागानेही यंदा 11.5 लाख कोटी रुपये कर जमा करण्याचे लक्ष्य गाठल्याचेही चंद्रा यांनी सांगितले. जाहिरात आणि प्रदर्शनामुळे कॉर्पोरेट करदात्यांची संख्या आठ लाखांवर पोहोचली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात एका लाखांची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या