कर्नाटकात मंत्र्याच्या घरावर आयकर विभागाचे छापे

1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटक सरकारमधील मंत्री सी. एस. पुट्टाराजू यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधीत व्यक्ती आणि कार्यालयांवर आयकर विभागाने गुरूवारी छापे मारले आहेत. आयकर विभागाने एकाचवेळी पुट्टाराजू यांच्या बंगळुरू, हसन, मंड्या आणि म्हैसूर येथील घर  व कार्यालयांवर छापे मारले आहेत. तसेच सार्वजनीक बांधकाम मंत्री एच. डी. रोवाना यांचे निकटवर्तीय नारायण रेड्डी, अश्वस्थ गौडा आणि राया गौडा यांच्यासह सार्वजनीक बंधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाच्या 17 ठेकेदार व 7 अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकले आहेत.

पुट्टाराजू हे कर्नाटक सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असून ते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एक दिवस आधीच राज्यातील काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांच्या घरावर आयकर विभाग छापे टाकणार असल्याबाबत शंका व्यक्त केली होती. तसेच यासाठी देशभरातून 300 पेक्षा जास्त आयकर अधीकारी आणि सीआरपीएफचे जवान तैनात केल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला होता. आयकर विभागाच्या तीन पथकांनी सीआरपीएफ जवानांसोबत ही कारवाई केली आहे.