ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक

16

सामना ऑनलाईन । मेलबर्न

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने अनोखी हॅटट्रीक नोंदवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात यजमानांचा कर्णधार अॅरॉन फिंचला बाद केले. भुवीने सलग तिन्ही सामन्यात फिंचची विकेट घेत नव्या विक्रमाची नोंद केली.

चहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी

मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे रंगला. या सामन्यात भुवनेश्वरने आपल्या स्वींगची करामत दाखवत फिंचला 6 धावांवर बोल्ड केले. त्यानंतर अॅडलेडमध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात भुवीने पुन्हा एकदा फिंचला बळीचा बकरा बनवत सहा धावांवर बोल्ड केले. त्यानंतर मेलबर्नमध्येही भुवीने आपल्या स्वींगच्या जोरावर फिंचला चकवत पायचीत केले. यासह मालिकेतील तिन्ही सामन्यात भुवीपुढे फिंचची डाळ शिजली नसल्याचे दिसले.

आपली प्रतिक्रिया द्या