LIVE : IND VS ENG 2nd TEST – हिंदुस्थानचा पहिला डाव १०७ धावांत आटोपला

सामना ऑनलाईन । लंडन

पावसाच्या लपंडावात हिंदुस्थान विरुध्द इंग्लड सामन्यात, हिंदुस्थान १०७ धावांवर बाद झाला. इंग्लडच्या गोलंदाज जेम्स एंडरसनला पिचचा भरपूर फायदा झाला. दुसर्‍या दिवशी सुक्रवारी ३५.२ ओव्हरमध्ये हिंदुस्थानी समुहाने १०७ धावा बनवून आपली पारी आटपली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडल्याने सामना रद्द करण्यात आला.

एंडरसने २० धावा देऊन पाच गडी बाद केले, क्रिस वोक्सने दोन गडी बाद केले तर स्टुअर्ट ब्रॉड आणि सॅम कुरन दोघांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला. हिंदुस्थानी फलंदाजात रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणजेच २९ धावा काढला.

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लॉर्डसवर सुरू दुसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने प्रथम नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले आहे. सामना सुरू झाल्यानंतर अनेकवेळा पावसाने व्यत्यय आणला.

लाईव्ह अपडेट –

 • दिनेश कार्तिक एका धावेवर बाद

 • हिंदुस्थानला डाव गडगडला, सहा बाद
 • हिंदुस्थानला पाचवा धक्का, पांड्या बाद

 • हिंदुस्थानच्या ५० धावा पूर्ण
 • हार्दिक पांड्या मैदानात
 • हिंदुस्थानला चौथा धक्का, विराट कोहली बाद

 • सामन्याला पुन्हा सुरुवात, विराट आणि रहाणे मैदानात
 • पावसाचा पुन्हा व्यत्यत, खेळ थांबवला
 • चोरटी धाव घेताना पुजारा धावबाद, हिंदुस्थानला तिसरा धक्का

 • सामन्याला पुन्हा सुरुवात, पुजारा-कोहली मैदानात
 • लॉर्डस कसोटीत पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला

 • अँडरसनने घेतले दोन्ही बळी
 • लोकेश राहुल ८ धावांवर बाद
 • हिंदुस्थानला सुरुवातीलाच दोन धक्के

 • हिंदुस्थानला पहिला धक्का, विजय शुन्यावर बाद

 • मुरली विजय आणि लोकेश राहूल सलामीला मैदानात
 • कुलदीप यादव आणि चेतेश्वर पुजाराला संधी
 • टीम इंडियामध्ये दोन बदल, शिखर धवन आणि उमेश यादवला विश्रांती

 • नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय