IND VS ENG TEST : इंग्लंडचा 118 धावांनी विजय, मालिका 4-1 ने जिंकली

सामना ऑनलाईन । ओव्हल

इंग्लंडसोबत झालेली पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 4-1 अशी गमावली आहे. ओव्हलच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला 118 धावांनी पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी टीम इंडियाने गमावली आहे.

इंग्लंडने दिलेल्या 464 धावांच्य बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची दमछाक झाली. पहिले तीन फलंदाज अवघ्या 2 धावांत बाद झाल्यानंतर राहुल आणि रहाणे या जोडीवर टीम इंडियाची कमान होती. ही जोडी जमली असे वाटत असतानाच रहाणे 37 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ हनुमा विहारी शून्यावर बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव संकटात सापडला. या संकटातून राहुल आणि पंतने टीम इंडियाला बाहेर काढत सामना वाचेल अशी आशा निर्माण केली. या दरम्यान दोघांनीही आपली शतकं पूर्ण केली. परंतु दीडशतकाकडे वाटचाल सुरू असताना राहुल 149 धावांवर बाद झाला आणि सामना टीम इंडियाच्या हातातून निसटला.

राहुल बाद झाल्यानंतर इंग्लंडने पुन्हा एकदा धारधार गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. पंत 114 धावांवर बाद झाला. त्यानंतर जाडेजा, शर्मा आणि शमीला इंग्लंडने झटपट टिपले आणि टीम इंडियाला 345 धावांवर ऑलआऊट केले. इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक 3, रशिद आणि करनने प्रत्येका दोन, तर ब्रॉड, मोईन अली आणि स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला.

लाईव्ह अपडेट –

 • इंग्लंडचा 118 धावांनी विजय, मालिका 4-1 ने जिंकली

 • हिंदुस्थानचा डाव आटोपला
 • जाडेजा 13 धावांवर बाद
 • हिंदुस्थानवर पराभवाचे सावट, नऊ गडी बाद

 • इशांत शर्मा 5 धावांवर बाद
 • हिंदुस्थानचे आठ गडी बाद

 • पंत 114 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला सातवा धक्का

 • राहुलचे दीडशतक हुकले, 149 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला सहावा धक्का

 • हिंदुस्थानला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता
 • चहापानापर्यंत हिंदुस्थानच्या 5 बाद 298 धावा

 • कसोटीतील पहिले शतक, षटकार ठोकत पूर्ण केले शतक
 • ऋषभ पंतने झळकावले शतक

 • हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
 • कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक
 • पंतचे अर्धशतक
 • पंत-राहुलची 100 धावांचा भागिदारी

 • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण

 • ऋषभ पंत-लोकेश राहुलमध्ये 50 धावांची भागिदारी
 • हिंदुस्थानचा संघ 297 धावांनी पिछाडीवर
 • लोकेश राहुल 108 आणि ऋषभ पंत 12 धावांवर नाबाद
 • लंचपर्यंत हिंदुस्थानच्या 5 बाद 167 धावा

 • के.एल राहुलचे पाच शतकं
  2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा
  2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 108 धावा
  2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 158 धावा
  2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 199 धावा
  2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक (खेळतोय)
 • कसोटी कारकीर्दीतील पाचवे शतक
 • लोकेश राहुलचे दमदार शतक

 • बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर विहारी शून्यावर बाद
 • हिंदुस्थानचा निम्मा संघ माघारी

 • पहिल्या डावातील अर्धशतकवीर विहारी मैदानात
 • मोईन अलीच्या गोलंदाजीवर रहाणे 37 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला चौथा धक्का

 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण

 • हिंदुस्थानचा संघ अद्यापही 380 धावांनी पिछाडीवर
 • लोकेश राहुलचे कसोटीतील 12 वे अर्धशतक