IND VS ENG TEST : चौथ्या दिवसअखेर टीम इंडिया 3 बाद 58 धावा

1

सामना ऑनलाईन । ओव्हल

ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 423 धावांवर घोषित करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी 464 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने दिलेल्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. धवन, पुजारा आणि कोहली अवघ्या 2 धावा फलकावर असताना बाद झाले. धवनने 1, तर पुजारा आणि कोहली शून्यावर बाद झाले. त्यानंतर राहुल आणि रहाणे या जोडीने आणखी पडझड होऊ न दिली नाही. दिवसअखेर हिंदुस्थानने 3 बाद 58 धावा केल्या असून विजयासाठी आणखी 406 धावांची आवश्यकता आहे.

तत्पूर्वी इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकने आपल्या अखेरच्या डावात शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या आणि अखेरच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत कुकने स्थान मिळवले आहे. कुकसह इंग्लंडचा कर्णधार जो रूटने देखील शतक झळकावले. शतकानंतर कुक आणि रुट विहारीच्या गोलंदाजीवर बाद झाले. कुकने 147 तर रुटने 125 धावा केल्या.

लाईव्ह अपडेट – 

 • पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 406 धावांची आवश्यकता
 • दिवसअखेर हिंंदुस्थानच्या 3 बाद 58 धावा
 • चौथ्या दिवसाचा खेळ संपला
 • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण

 • विराट कोहली शून्यावर बाद
 • हिंदुस्थानचा डाव कोसळला

 • पुजारा शून्यावर बाद, अँडरनने घेतला दुसरा बळी
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का

 • शिखर धवन एका धावेवर बाद, अँडरसनने घेतला बळी
 • हिंदुस्थानची खराब सुरुवात

 • करन 21 धावांवर बाद
 • विहारीची पहिल्या डावात हॅटट्रीक, घेतला तिसरा बळी
 • इंग्लंडला आठवा धक्का

 • इंग्लंडच्या 400 धावा पूर्ण

 • जाडेजाचा तिसरा बळी, स्टोक्स 37 धावांवर बाद
 • इंग्लंडला सातवा धक्का

 • बेन स्टोक्स 13 आणि करन 7 धावांवर नाबाद
 • चहापानापर्यंत इंग्लंड 6 बाद 364

 • इंग्लंडची आघाडी पोहोचली 400 पार
 • बटलर जाडेजाच्या गोलंदावीर शून्यावर बाद
 • इंग्लंडला सहावा धक्का

 • शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो 18 धावांवर बाद
 • इंग्लंडला पाचवा धक्का

 • इंग्लंडच्या 350 धावा पूर्ण
 • अखेरच्या डावात कुक 147 धावांवर बाद, विहारीचा दुसरा बळी
 • इंग्लंडला सलग दोन धक्के

 • हनुमा विहारीने घेतला कारकीर्दीतील पहिला बळी
 • शतकवीर कर्णदार जो रूट 125 धावांवर बाद
 • इंग्लंडला तिसरा धक्का

 • इंग्लंडच्या 300 धावा पूर्ण, आघाडी 350 पार

 • इंग्लंडची आघाडी पोहोचली 300 पार
 • कर्णधार रुटचे दमदार शतक

 • रुटची शतकाकडे वाटचाल
 • इंग्लंडच्या 250 धावा पूर्ण
 • लंचपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 243 धावा

 • कुकचे कसोटी शतक, अखेरच्या डावात झळकावले शतक

 • कुकची शतकाकडे वाटचाल
 • इंग्लंडच्या दोनशे धावा पूर्ण

 • रुटचे अर्धशतक
 • इंग्लंडच्या दीडशे धावा पूर्ण

 • कुकचे अर्धशतक
 • कुक आणि रुट मैदानात
 • चौथ्या दिवसाचा खेळ सुरू