सेन्चुरियन मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा; २२ पैकी १७ कसोटी सामन्यात विजय

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारी सेन्चुरियन मैदानात खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर हिंदुस्थानी संघानं कसून सराव केला. पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा ७२ धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मालिकेतलं आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा कसोटी सामना जिंकणं हिंदुस्थानला अनिवार्य आहे. सेन्चुरियन मैदानात हिंदुस्थानने आजवर एकच कसोटी सामना खेळला आहे, यामध्ये हिंदुस्थानचा २५ धावांनी पराभव झाला होता.

सेन्चुरियन मैदानात दक्षिण अफ्रिकेचा दबदबा राहिला आहे. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने २२ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी १७ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर ३ सामने अनिर्णित राहिले. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने केवळ २ सामने गमावले आहे. त्यामुळे या मैदानावर जिंकण्यासाठी हिंदुस्थानी संघाला जोर लावावा लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात हार्दिक पांड्या वगळता हिंदुस्थानी फलंदाजांना चांगली खेळी करता आली नव्हती. त्यामुळे फलंदाजांना या सामन्यात आपली चमक दाखवावी लागणार आहे.

संभाव्य संघ
हिंदुस्थान- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल

दक्षिण आफ्रिका- फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, टेम्बा बावुमा, थ्युनिस डे ब्रूयेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडिन मार्कराम, मोर्ने मोर्केल, क्रिस मोरिस, अँडिले पेलक्वायो, वेर्नोन फिलेंडर, कगीसो रबादा, लुंगी नगीदी और डुआने ओलिवर