INDvWI दुसऱ्या कसोटीवर ‘तितली’चे सावट, सामना होणार की नाही?

1

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या (शुक्रवार) पासून हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर दुसरा सामना जिंकून विंडीजला क्लीन स्विप देण्यासाठी विराटचा संघ सज्ज आहे. परंतु टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. हवामान विभागाने या सामन्यावर ‘तितली’ चक्रीवादळाचे सावट आहे. ‘तितली’ हे चक्रीवादळ हे सध्या 150 किमी वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यावर या चक्रीवादळचा प्रभाव पडू शकतो.

rajeev-gandhi-stadium

हैदराबाद कसोटी सामना 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाने 12 खेळाडूंची घोषणा केली. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉ याच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला असून शार्दुल ठाकूरची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –
के.एल. राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.